Saturday, April 13, 2019

आठवणीतले प्रा. एम. आर. रिसवडकर सर

आठवणीतले प्रा. एम. आर. रिसवडकर सर

१९९९ साल.  पुणे विद्यापीठात MLISc ला प्रा. रिसवडकर सर Information Processing हा विषय शिकवणार असे समजले  आणि मनात उत्सुकता दाटून आली.  सरांबद्ल खूप ऐकले होते.   वयाच्या ७० व्या वर्षी असलेला सरांचा उत्साह आणि विषयावरील प्रभुत्व पाहून मन थक्क झाले. सर  वर्गात  कोणत्याही टिपणाशिवाय, पुस्तकाशिवाय अतिशय सहज व सोप्या भाषेत  शिकवत असत. सरांनी कधीहि एका जागी उभे राहून शिकवले नाही. सरांनी शिकवलेले Indexing, abstracting आजहि विसरू शकत नाही.  सर गेले  असे कळल्यावर २० वर्षांपूर्वीचे सरांचे शिकवणे डोळ्यासमोर आले. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…



No comments:

Post a Comment