Monday, April 22, 2019

अंतरराष्ट्रीय ग्रंथ आणि स्वामित्व हक्क दिन



Image result for unesco image world book day





आज 23 एप्रिल, जागतिक पुस्तक दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा.  हा दिवस जागतिक ग्रंथ आणि स्वामित्व हक्क दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून  युनेस्कोतर्फे जगभर कार्यक्रम राबवले जातात. वाचन संस्कृती, ग्रंथप्रकाशन वाढवणे आणि स्वामित्व हक्काचा प्रचार करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. याच बरोबर मानवतेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात हातभार लावणाऱ्या ग्रंथ आणि लेखक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हाही उद्देश असतो.
१९९५ सालापासून १०० पेक्षा जास्त देशात हा दिवस साजरा केला जातो. यु. के आणि आयर्लंडमध्ये मात्र तो मार्च महिन्यात साजरा केला जातो. हा दिवस २३ एप्रिलला साजरा करण्याचे कारण म्हणजे जॉर्जियन कॅलेंडरनुसार अनेक जागतिक मान्यताप्राप्त लेखकांची २३ एप्रिलला जयंती किंवा स्मृतिदिन असतो. उदाहरणार्थ विल्यम शेक्सपियर, Voldimir Nobokov, Manual Mejia Vallejo, Miguel de Cervantes, JoJep Pla, Maurice Druon, Hallodo'r Laxness इत्यादी.
युनेस्को, आंतरराष्ट्रीय प्रकाशक संघटना, ग्रंथ विक्रेते आणि  आंतरराष्ट्रीय ग्रंथालय संघटना दरवर्षी एक जागतिक पुस्तक राजधानी ठरवतात व येणाऱ्या वर्षात २३ एप्रिल  पासून विविध कार्यक्रम आयोजित करतात.  २०१९ सालासाठी   United Arab Emirates मधील शारजा हे शहर निवडले आहे.  यावर्षीचे घोषवाक्य आहे रीड: यू आर एन इन शारजा.  या अंतर्गत सहा प्रमुख संकल्पनांवर २३ एप्रिल २०२० पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. समावेशकता, वाचन वारसा, आऊ रिच (जास्‍तीत जास्‍त लोकांपर्यंत पोहोचणे),   प्रकाशन आणि मुले याद्वारे शहरातील मुलांमध्ये वाचनसंस्कृती वाढवून ललित साहित्य निर्मितीतील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवनवीन कल्पनांना वाव देणे हा यामागचा उद्देश आहे.  यासाठी भाषणस्वातंत्र्य या विषयावर परिषद, तरुण कवींसाठी स्पर्धा,  ब्रेल लिपीतील ग्रंथनिर्मितीसाठी कार्यशाळा अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  २०२० सालाची जागतिक पुस्तक राजधानी Kuala Lumpur  ही आत्ताच ठरवली आहे.
जागतिक ग्रंथ दिनाच्या केवळ शुभेच्छा न देता आपण सर्वांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रत्येकाने वर्षभरात किमान दोन चांगली पुस्तके वाचेन असा निर्धार केला पाहिजे. ज्यांना अजिबातच वेळ नाही पण वाचनाची आवड आहे अशांनी अमृत देशमुख यांनी सुरू केलेले बुकलेट हे ॲप डाऊनलोड करून विविध पुस्तकांचा वाचनीय व श्रवणीय आनंद घ्यायला काहीच हरकत नाही.  अनेक पुस्तके ऑडिओ स्वरूपातही उपलब्ध आहेत त्याचाही आस्वाद घेता येऊ शकतो. त्याच प्रमाणे दुसऱ्याचे लेखन, फोटो, आकृत्या वापरताना त्यांच्या स्वामित्व हक्काचा मान राखला जाईल असे पाहूया.
सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि लेखक जिम ट्रिलिज यांनी म्हटले आहे की फारसे वाचन न करणाऱ्या करणाऱ्या राष्ट्राला कमी माहिती व ज्ञान असते. आणि ज्या राष्ट्राला कमी  माहिती आणि ज्ञान असते ते राष्ट्र घर,  बाजारपेठ,  न्याय आणि नेते यांची  योग्य  निवड करू शकत नाहीत आणि या निर्णयांचा आपोआपच संपूर्ण राष्ट्रावर परिणाम होतो.

Source: http://www.unesco.org/new/en/unesco/events

No comments:

Post a Comment